Pimpri: स्थायी समितीचा धमाका; शेवटच्या सभेत पावणेचारशे कोटींच्या विकासकामांच्या खर्चाला मंजुरी

उपसूचनांचा पडला पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची सभा आज (गुरुवारी)मोठ्या धुमधडाक्यात पार पडली. या सभेत विषयपत्रिकेवरील 20 कोटी तर आयत्यावेळी तब्बल 370 कोटी अशा एकूण 390 कोटींच्या विकासकामाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. उपसूचनांचा अक्ष:रशा पाऊस पडला आहे. शेवटच्या सभेत एवढा विकासकामाच्या खर्चाला मंजुरी दिल्याने सदस्यांना ‘लॉटरी’ लागली आहे.

सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची आज शेवटची सभा रात्री उशिरा पार पडली. रात्री सात वाजता सुरु झालेली सभा नऊ वाजता संपली. स्थायी समितीतील दोन वर्षाची मुदत संपलेल्या आठ नगरसेवकांच्या जागी नवीन सदस्यांची निवड झाली आहे.  या आठ सदस्यांची आजची अखेरची स्थायी समितीची सभा झाली. या सदस्यांचा कार्यकाळ आज संपणार आहे. मुदत संपण्याच्या दिवशी स्थायीने शहर विकासाच्या सुमारे 390 कोटींच्या विकासकामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे सदस्यांना ‘लॉटरी’ लागली आहे.

विषयपत्रिकेवरील 20 कोटी तर आयत्यावेळी तब्बल 150 उपसूचनांद्वारे 370 कोटी अशा एकूण 390 कोटींच्या विकासकामाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.  उपसूचनांचा अक्ष:रशा पाऊस पडला आहे. तब्बल 150 उपसूचना देण्यात आल्या. शेवटच्या सभेत एवढा विकासकामाच्या खर्चाला मंजुरी दिल्याने सदस्यांना ‘लॉटरी’ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879a67d3fdd12ace',t:'MTcxNDAwNjkyNy41MDcwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();