_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri : पीसीएमसी स्ट्रायकर्स, मातोश्री स्कूल अंतिम फेरीत

सृजन करंडक 2019 "स्लम फुटबॉल'

-सुपर 3 लढती कमालीच्या चुरशीत
-सुपर 3 लढतीत तिनही संघांचा एक विजय, एक पराभव
-तिहेरी बरोबरीनंतर प्राथमिक साखळी फेरीतील गोल सरासरीने अंतिम संघ निश्‍चित

एमपीसी न्यूज – पीसीएमसी स्ट्रायकर्स आणि मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूल यांच्यात यंदाच्या सृजन करंडक 2019 “स्लम फुटबॉल’ सिक्‍स अ साईड स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम लढत रंगणार आहे. औंध येथील चोंडे पाटिल स्पोर्टस येथे ही स्पर्धा सुरू आहे.

साखळी लढतींनंतर “सुपर 3′ गटासाठी पात्र ठरलेल्या पीसीएमसी स्ट्रायकर्स, मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूल आणि आयडियल इंग्लिश स्कूल या तीनही संघांची कामगिरी एक विजय, एक पराभव अशी समान राहिली. त्यामुळे प्राथमिक फेरीच्या गोल सरासरीच्या आधारावर पीसीएमसी आणि मातोश्री या संघांना अंतिम फेरीसाठी पात्र धरण्यात आले.

“सुपर 3’च्या पहिल्या सामन्यात पीसीएमसी स्ट्रायकर्स संघाने मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूलचा 2-0 असा पराभव केला. संदेश सांळुके याने चौथ्या मिनिटाला, तर मयुर साळुंके याने सहाव्या मिनिटाला गोल केला. मात्र, दुसऱ्या सामन्यात पीसीएमसी संघाला आयडियल इंग्लिश माध्यम स्कूल संघाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. आयडियलकडून ओम महाडिक याने दोन मिनिटात दोन गोल केले. त्याने प्रथम 11व्या आणि नंतर 13व्या मिनिटाला गोल केला.

मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूलने आपल्या दुसऱ्या सामन्यात आयडियल इंग्लिश माध्यम स्कूलचा 2-0 अशाच फरकाने पराभव करून आपले आव्हान राखले. त्यांच्याकडून चेचन मुरुंगे याने 5व्या, तर शुभम यादव याने 14व्या मिनिटाला गोल केला.

_MPC_DIR_MPU_II

“सुपर 3′ च्या तीनही संघाच्या सामन्यानंतर तीनही संघांची स्थिती 2-2 अशी राहिल्याने गोल सरासरी शून्य अशी आली. त्यामुळे “सुपर 3′ लढतीनंतर स्थिती बरोबरीचीच राहिली. त्यामुळे प्राथमिक साखळीतील गोल सरासरी लक्षात घेऊन अंतिम फेरीचे संघ ठरविण्यात आले.

निकाल – (सुपर 3)

14 वर्षांखालील मुले – पीसीएमसी स्ट्रायकर्स 2 (संदेश साळुंके 4थे, मयुर साळुंके 6वे मिनिट) वि.वि. मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूल 0

मातोश्री इंग्लिश माध्यम स्कूल 2 (चेतन मुरुंगे 4थे, शुभम यादव 14वे मिनिट) वि.वि. आयडियल इंग्लिश माध्यम स्कूल 0

आयडियल इंग्लिश माध्यम स्कूल 2 (ओम महाडिक 11 आणि 13वे मिनिट) वि.वि. पीसीएमसी स्ट्रायकर्स 0.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.