Pune : पीसीएमसी स्ट्रायकर्स, अनंतराव पब्लिक स्कूल गटात अव्वल

एमपीसी न्यूज – “सृजन कप 2019′ सिक्‍स अ साई स्लम फुटबॉल स्पर्धेत पीसीएमसी आणि कै. अनंतराव पवार इंग्लिश माध्यम प्रशाला संघांनी गटात अव्वल स्थान मिळविले. ही स्पर्धा कासारवाडी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे झाली. मुलांच्या 14 वर्षांखालील गटात पीसीएमसी स्ट्रायकर्स संघाने ब गटात ज्योती इंग्लिश प्रशाला संघावर दोन विजय मिळवून आपली पात्रता सिद्ध केली. पहिल्या सामन्यात त्यांनी देवाशिष बेहेरा याने केलेल्या गोलच्या जोरावर 8-0 असा विजय मिळविला. त्यानंतर त्यांनी मयुर साळुंकेच्या पाच गोलच्या जोरावर 8-0 अशाच फरकाने दुसरा विजय मिळविला.

मुलांच्या 16 वर्षांखालील गटात अनंतराव पवार इंग्लिश माध्यम प्रशाला संघाने “ब’ गटातील आपल्या सर्व लढती जिंकून वर्चस्व राखले. पहिल्या सामन्यात त्यांनी ज्योती इंग्लिश प्रशाला संघावर 5-0 असा विजय मिळविला. यात प्रणव दिघे याने दोन गोल नोंदवले. त्यानंतर त्यांनी हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स ” संघाचा 2-0 असा पराभव केला. प्रणव दिघे आणि विशाल सूर्यवंशी यांनी गोल केले. तिसऱ्या सामन्यात त्यांनी सोनबा रायर्डस संघाचा 2-1 असा पराभव केला.

निकाल –
14 वर्षांखालील मुले ब गट – पीसीएमसी स्ट्रायकर्स 9 (देवाशिष बेहेरा 4, मयूर साळुंके 2, संदेश साळुंके, अंकित चौहान) वि.वि. ज्योती इंग्लिश स्कूल 0, पीसीएमसी स्ट्रायकर्स 8 (मयुर साळुंके 5, देवाशिष बेहेरा 3, संदेश साळुंके 2) वि.वि. ज्योती इंग्लिश स्कूल 0

16 वषांखालील ब गट – अनंतराव पवार इंग्लिश माध्यम स्कूल 5 (प्रणव दिघे 2, कौस्तुभ वाघमारे, विशाल सूर्यवंशी, स्वयम जाधव) वि.वि. ज्योती प्रशाला 0, सोनबा रेडर्स 2 (नाझिर इनामदार, स्वयंगोल) वि.वि. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स ब 1 (परशुराम गवाडे), सोनबा रेडर्स 9 (नाझिर इनामदार 3, रोहन बडदे 3, यश सुरवसे 2) वि.वि. ज्योती इंग्लिश स्कूल 0, अनंतराव पवार इंग्लिश माध्यम स्कूल 2 (प्रणव दिघे , विशाल सुर्यवंशी) वि.वि. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स ब 0, हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स ब 5 (सागर गवळी 2, आदित्य शेलार 2, परशुराम गवाडे) वि.वि. ज्योती प्रशाला 1 (हाजीसाब रोजे), अनंतराव पवार इंग्लिश माध्यम स्कूल 2 (प्रणव दिघे, विशाल सूर्यवंशी) वि.वि. सोनबा रेडर्स 1 (यश सुरवसे)

क गट – मेगा प्रो फुटबॉल अकादमी 5 (खुशहाल सिंग 3, आदित्य पवार, असिब शेख) वि.वि. दीनदयाळ माध्यमिक विद्यालय 0, सुखाई एफसी 8 (अभिषेक पाल 4, मयूर वाघिरे 2, प्रतिक भालेराव, निरज माने) वि.वि. दीनदयाळ माध्यमिक विद्यालय 0, मेगा प्रो फुटबॉल अकादमी 3 (खुसहाल सिंग, दोन स्वयंगोल) वि.वि. सुखाई एफसी 1 (अभिषेक पाल), सुखाई एफसी 2 (निरज माने, प्रतिक भालेराव) वि.वि. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स अ 0, हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स अ 0 अनिर्णित वि. दीनदायळ माध्यमिक विद्यालय 0, मेगा प्रो फुटबॉल अकादमी 3 (खुशहाल सिंग 3, सपना ज्ञानदेव) वि.वि. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.