BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा 

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण विभागाने दिघी-बोपखेल परिसरातील चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.  दिघीतील संत गजानन महाराजनगर येथील सात आणि बोपखेलमधील गणेशनगर येथील तीन अशा दहा बांधकामवर कारवाई केली. एकूण क्षेत्रफळ अंदाजे 713.49 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. 

‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक चारमध्ये अनधिकृत बांधकामे चालू होती. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज (गुरुवारी) या बांधकामांवर धडक कारवाई केली. दिघीतील संत गजानन महाराजनगर येथील सात आणि बोपखेलमधील गणेशनगर येथील तीन अशा दहा बांधकामावर कारवाई केली. एकूण क्षेत्रफळ अंदाजे 713.49 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.

ही कारवाई शहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता के.ए.सागर यांच्यासह अतिक्रमण पथक, सात मजूर, एक जेसीबी, दोन डंपर यांच्या सह्याने करण्यात आली. दरम्यान, तळवडे येथे देहू-आळंदी रस्ता लगत पत्रा लावून बंद केलेले रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

HB_POST_END_FTR-A2

.