PCMC : शहरातील अधिकृत होर्डिंगच्या मजबुतीकरणाचा प्रश्न गंभीर; आजपर्यंत किती पडले होर्डिंग?

एमपीसी न्यूज –  वादळी वार्‍यामुळे मोशीत एक अधिकृत लोखंडी सांगाडा होर्डिंग पडल्याने (PCMC) होर्डिंगच्या मजबुतीकरणाचा प्रश्न समोर आला आहे. आजपर्यंत होर्डिंग पडण्याच्या चारवेळा घटना घडल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात किवळे येथे गेल्यावर्षी 17 एप्रिल रोजी  लोखंडी सांगाडा कोसळून पाच जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर 191 अनधिकृत होर्डिंगवर पिंपरी – चिंचवड महापालिकेने वर्षभरात कारवाई केली आहे. महापालिकेने पुन्हा होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षण सुरू असतानाच अधिकृत होर्डिंग कोसळल्याने सांगाड्याच्या मजबुतीकरणाचा प्रश्न समोर आला आहे. शहरातील काही भागात गुरुवारी दुपारी वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला.

Talegaon Dabhade : वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे तळेगाव परिसरातील बत्ती गुल

मोशी येथील गणेश साम्राज्य चौकात लोखंडी होर्डिंग उभारण्यात आला होता. हे होर्डिंग आनंद जाहिरात संस्थेचा  आहे. या होर्डिंगचा आकार 20 बाय 40 असा आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे हे होर्डिंग सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाकले आणि अचानक कोसळले.  सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही.

शहरातील लोखंडी होर्डिंग कोसळण्याच्या घटना

2017 – देहू – आळंदी रस्त्यावर टपरीवर होर्डिंग कोसळून एका नागरिकाचा मृत्यु, 1 जून 2018 पुनावळे येथे रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या अंगावर होर्डिंग कोसळून महिलेचा मृत्यु, 29 एप्रिल 2022 – पुणे – आळंदी रस्त्यावर दिघी – दत्तनगर येथे दुकान आणि घरावर होर्डिंग कोसळला होता. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. 17 एप्रिल 2023- किवळे येथे  लोखंडी होर्डिंग कोसळून चार महिलांसह एक पुरूष असा पाच जणांचा बळी (PCMC) गेला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.