PCMC : कर संकलन विभागाकडे नोंद झालेल्या मालमत्तांची संख्या सहा लाखांच्या वर!

एमपीसी न्यूज – वीज, पाणी या मूलभूत सुविधांसह (PCMC) सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, आयटी पार्क, नामांकित शैक्षणिक संस्था, वैद्यकीय उपचारांची दर्जेदार सुविधा यामुळे पिंपरी-चिंचवड शहर नागरिकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याचाच परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षांत शहरातील मालमत्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून 31मे 2023 अखेर 6 लाख 2 हजार 203 नोंदणीकृत मालमत्ता झाल्या आहेत. तर गेल्या वर्षभरात शहरात 25 हजार 637 मालमत्तांची भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवडनगरीची लोकसंख्या सुमारे 30 लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नेहरू अभियानांतर्गत (जेएनएनयुआरएम) शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सुसज्ज आणि प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल शहराची ओळख बनली आहे. शहरात पायाभूत सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. शहराच्या विविध भागात झालेली उद्याने, क्रिडांगणे, जलतरण तलाव, चौकाचे सुशोभीकरण यासह महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे हा परिसर नागरिकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे दरवर्षाला शेकडो मालमत्तांची भर पडत आहे. सन 2017 मध्ये शहरात 4 लाख 50 हजार 761 मालमत्ता होत्या. सध्या 6 लाख 2 हजार 203 मालमत्ता आहेत. यावरून शहराच्या वाढीचा आलेख लक्षात येत आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरालगतच (PCMC) हिंजवडी आयटी पार्क, तळवडे आयटी पार्क, चाकण, रांजणगाव एमआयडीसी हा भाग येतो. या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामासाठी नागरिक आहेत. संपूर्ण देशभरातून या भागात कामगार वर्ग रोजगारानिमित्त वास्तव्यास आहे. मात्र, या भागात अंतर्गत रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. त्यामुळे येथील कामगार वर्ग पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास प्राधान्य देतो. याचाच परिणाम आयटी पार्क आणि एमआयडीसीलगतच्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प उभारले जात आहेत.

वर्षमालमत्ता संख्यावाढ
2019-20527338
2020-2154272415386
2021-2257159228868
2022-2359722925637
2023-246022034974

 

या भागात वाढताहेत मालमत्ता –

शहराच्या चारही बाजूंनी मोठ-मोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. शहरात 17 मालमत्ता कराची विभागीय कार्यालये आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाकड, चिखली, मोशी, किवळे, चऱ्होली, थेरगाव, सांगवी, भोसरी, दिघी-बोपखेल या कार्यालय परिसरात मालमत्ता वाढीचा वेग जास्त आहे.

मिळकती वाढत असल्याने उत्पन्नामध्येही गरूडझेप –

शहरात औद्योगिक मिळकतीसह निवासी मिळकतींच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच महापालिकेच्या उत्पन्नातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. गतवर्षी कर संकलन विभागाचे पालिकेच्या इतिहासात 817 कोटी रुपयांचा कर वसूल केला. 2023-24 या आर्थिक वर्षात 1 हजार कोटी रुपयांचा कर वसूलीचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी टार्गेट ठेवले आहे.

पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड शहराचा मालमत्ता वाढीचा दर अधिक आहे. शहरातील प्रशस्त रुंद रस्ते, उद्याने, क्रीडांगणे, इतर मूलभूत सोयी सुविधा यामुळे नागरिक पिंपरी-चिंचवडला पसंती देत आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा करणे आणि शहराचा शाश्वत विकास ही दोन आव्हाने सध्या पालिकेसमोर आहेत. त्यांनाच प्राधान्य देऊन काम केले जाईल. नवीन सर्वेक्षणाच्या माध्यमातून कर संकलन विभागाबरोबर नियोजनासाठी अन्य आवश्यक माहिती संकलित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुठल्या पॉकेटमध्ये काय गरजा आहेत हे निश्चित करणे सोपे जाईल. त्यातून नियोजनबद्ध विकास शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या सर्वंकष सर्वेक्षणाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

PCMC : आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे तर डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे ‘अतिरिक्त’ची जबाबदारी

विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे विभागाचे मनुष्यबळ हे अधिकाधिक कर आकारणीकडे वळवता येणे शक्य झाले आहे. मात्र आजही किमान पन्नास हजार मालमत्ता या कराच्या कक्षेत नसाव्यात असा अंदाज आहे. नवीन सर्वंकष सर्वेक्षणाच्या माध्यमातून वाढीव, नवीन मालमत्ता कराच्या कक्षेत आणल्या जातील. शहराचे निव्वळ तीन झोनमध्ये वर्गीकरण केले गेले आहे, ते बदलून शहरात मायक्रो झोनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे समन्यायी आणि पारदर्शी कर प्रणाली लागू करता येईल. याचा फक्त कर संकलन विभागच नव्हे तर पालिकेच्या अन्य विभागांना कामांचे नियोजन करण्यात मदत होईल, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.