PCMC: दहावीच्या परीक्षेत एकही कॉपीचे प्रकरण नाही; शिक्षण मंडळाचा दावा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (PCMC) शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहरात कॉपीचा एकही प्रकार घडला नाही.

राज्यात दहावीच्या परीक्षेत 113, तर बारावीच्या परीक्षेत 260 अशी एकूण 373 कॉपीची प्रकरणे आढळली. तसेच प्रश्नपत्रिकांमधील चुका, पेपरफुटीची प्रकरणे, कॉपीची प्रकरणे यांचा समावेश आहे. या प्रकरणांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात एकही कॉपीचा प्रकार घडला नाही. शहरात 46 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली. खासगी व महापालिकेच्या शाळेतील एकूण 33 हजार 587 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली.

शहरातील एकाही केंद्रावर कॉपीचा प्रकार घडू नये, यासाठी (PCMC) महापालिकेच्या शिक्षण विभागाने उत्तम नियोजन केले होते. त्यानुसार पेपरच्या दिवशी 5 जणांची दोन फिरती पथकेही नेमण्यात आली होती. त्यामुळेच कॉपी मुक्त अभियान यशस्वी झाले आहे.

Today’s Horoscope 30 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.