Pimpri: ‘एचए’ जवळील मोकळ्या जागेचे महापालिका सुशोभिकरण करणार

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीजवळील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत निगडी ते दापोडी रस्त्यापर्यंतचा विकास आराखड्यातील रस्ता बीआरटीएस कॉरीडॉर ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. या रस्त्यावर एच. ए. कंपनीजवळ हलक्या वाहनांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी महापालिकेतर्फे ‘सब-वे’ करण्यात आलेला आहे. या ‘सब-वे’च्या दोन्ही बाजुला मोकळ्या जागा तयार झाल्या आहेत. या मोकळ्या जागांचा सद्या काहीही वापर होत नाही.

प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवकांनी या मोकळ्या जागेच्या सुशोभिकरण करण्यात यावे, यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या जागांचे सुशोभिकरण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यासाठी महापालिकेच्या सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात विशेष योजना म्हणून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हा परिसर सुशोभिकरण करण्यासाठी वास्तूविशारद यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका आर्किटेक्ट पॅनेलवरील आर्किटेक्ट यांची नेमणूक करण्यासाठी कोटेशन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्याला अनुसरून मेसर्स शेलस्पेस आर्किटेक्चर, मेसर्स नुझशिल आर्किटेक्ट आणि मेसर्स ओरीजीन असोशिएट्स या तिघांनी निविदा सादर केल्या. त्यातील सर्वाधिक कमी दर मेसर्स शेलस्पेस आर्किटेक्चर यांनी सादर केला. त्यामुळे हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स कंपनीजवळील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी वास्तूविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मेसर्स शेलस्पेस आर्किटेक्चर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.