Pimpri: महापालिका भरविणार तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सव

एमपीसी न्यूज – बालदिनाचे निमित्तसाधत पिंपरी-चिंचवड महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 25 नोव्हेंबर 2018 दरम्यान बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात विविध चित्रपट, लघुपट दाखविले जाणार आहेत. कार्यशाळा, गटचर्चा होणार आहे. हे चित्रपट सर्व मुलांसाठी विनामूल्य असून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

याबाबतची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. यावेळी पालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे, फोर्ब्ज मार्शल कंपनीच्या संचालिका रती फोर्ब्ज उपस्थित होत्या.

आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांना वेळ मिळत नाही. त्यामुळे बाल दिनाचे निमित्त साधत मुलांसाठी खास बनवलेल्या चित्रपटांचा मुलांना आस्वाद घेता यावा. या हेतूने बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध चित्रपट, लघुपट दाखविले जाणार आहेत. चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 23, 24 नोव्हेंबर रोजी चिंचवड येथील कार्निवल सिनेमागृहात सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर तीन दिवस चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये सकाळी नऊ ते सव्वादहा आणि दुपारी दीड ते पावणेतीन या वेळेत लघुपट, जागतिक सिनेमा दाखविला जाणार आहे.

सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. परंतु, नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 020-39858605 तसेच कासारवाडीतील फोर्ब्ज कंपनीच्या कम्युनिटी सेंटर येथे संपर्क साधू शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.