Pimpri: कोरोना ‘पॉझिटीव्ह’ पण, लक्षणे नसलेल्या रुग्णांना महापालिका ‘या’ ठिकाणी हलविणार

PCMC to shift asymptomatic covid19 patients to Balewadi stadium, while Covid19 dedicated hospital at YCM to admit symptomatic coronavirus patients

एमपीसी न्यूज – कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. पण, लक्षणे काहीच नाहीत. अशा रुग्णांना पिंपरी-चिंचवड महापालिका आता बालेवाडीतील क्रीडा संकुलात ठेवणार आहे. केवळ कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत. ज्यांच्यावर उपचार करायचे आहेत. अशा रुग्णांनाच वायसीएमएचमध्ये ठेवले जाणार आहे. तर, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना भोसरीतील रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच एनआयव्हीवर ताण आल्याने महापालिका आता प्राधान्याने ‘प्रि-स्क्रीनिंग’ करणार आहे.

त्यानुसार कोरोनाची लक्षणे आहेत, हाय रिस्क आहे, त्यांचीच तपासणी तातडीने केली जाणार आहे. बाकीच्यांना होम क्वारंटाईन करण्यात येईल. लक्षणे आली तर तपासणी केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संशयितांच्या तपासणीची संख्या वाढली आहे. दररोज 100 ते 200 जण तपासणीसाठी येत आहेत. कोरोना पॉझिटीव्ह पण कोणतीही लक्षणे नाहीत. या रुग्णांना वायसीएममध्ये ठेवण्याची गरज नाही. त्यांना फक्त ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या रुग्णांना बालेवाडीत ठेवण्यात येणार आहे.

त्यासाठी बालेवाडी स्टेडीयम येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 300 बेडचा क्वारंटाईन वार्ड तयार करण्यात आला आहे. रुग्णांना बालेवाडीला नेण्यासाठी पीएमपीएमलकडून बसेस घेतल्या आहेत. सध्या सक्रिय रुग्ण संख्या कमी आहे. रुग्ण संख्या वाढल्यास पुढील तयारी करुन ठेवली आहे. रविवारी केंद्र सरकारच्या नवीन सुचनांनुसार 10 दिवसांच्या उपचारानंतर 34 रुग्णांना डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यामुळे सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. केवळ 53 सक्रिय रुग्ण आहेत.

तपासणीसाठी येणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्हीवर) ताण वाढला आहे. त्यामुळे रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागत आहेत. त्यामुळे सर्व रुग्णांना वायसीएममध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. तपासणीसाठी येणा-या नागरिकांना वायसीएमएचमध्ये ठेवणार नाही. ज्यांच्यावर उपचार करायचे आहेत. कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत.

अशा रुग्णांणाच वायसीएमएचमध्ये ठेवले जाणार आहे. तर, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना भोसरीतील रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. पॉझिटीव्ह आहेत पण लक्षणे काहीच नाहीत. अशा रुग्णांना बालेवाडीत ठेवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी अथवा उद्या सकाळपासून रुग्ण बालेवाडीत नेले जातील. वैद्यकीय आणि प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचा-यांकडे त्याची जबाबदारी दिली जाईल.

मोशीतील मागासवर्गींय मुलांच्या वसतीगृहामध्ये 275 बेडची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी आता केवळ तपासणीसाठी रुग्णांचे नमुने घेण्यात येतील. तपाण्यासाठी दररोज 100 ते 200 रुग्ण येतात. एनआयव्हीवर ताण वाढला आहे. त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्राधान्याने प्रि-स्क्रीनिंग करणार आहे.

त्यानुसार कोरोनाची लक्षणे आहेत, हाय रिस्क आहे, त्यांचीच तपासणी तातडीने केली जाणार आहे. बाकीच्यांना होम क्वारंटाईन करण्यात येईल. लक्षणे आली तर तपासणी केली जाणार आहे. भोसरी-एमआयडीसी परिसरातील एड्‌सबाबत स्वतंत्रपणे संशोधन करणा-या राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्था (नारी) कोरोनाची चाचणी केली जात आहे. पण, त्यांची क्षमता वाढली नाही. आत्ता फक्त 10 ते 20 लोकांची तपासणी केली जात आहे. क्षमता वाढल्यास अधिकची तपासणी केली जाईल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.