PCMC News : ई-गव्हर्नन्स निर्देशांकात सलग दुस-या वर्षी महापालिका राज्यात अव्वल

एमपीसी न्यूज – पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेश (PRO) या संस्थेतर्फे राज्यातील महापालिकेच्या वेबसाईटचा अभ्यास करुन सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या तीन (PCMC News) निकर्षावर प्रसिद्ध केलेल्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. महापालिकेने 10 पैकी 6.23 गुण प्राप्त केले आहेत. सलग दुस-यावर्षी महापालिका अव्वल आली आहे.
पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनचा “ई-गव्हर्नन्स इंडेक्स” हा अशा प्रकारचा एकमेव अभ्यास प्रकल्प आहे. हा निर्देशांक संकलित करण्याचा प्रथम आणि मुख्य उद्देश म्हणजे नागरिक आणि सरकारी यंत्रणांना समान रीतीने सक्षम करणे, माहिती तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमध्ये नागरिकांचा सहभाग, माहितीची देवाणघेवाण आणि सेवा वितरणासाठी नवीन व्यासपीठांची उपलब्धता करुन देणे.
सरकार आणि नागरिक यांच्यामध्ये डिजिटल क्रांतीद्वारे संवाद साधणेसाठी तसेच शहरी आणि ग्रामीण स्वराज्यसंस्थाच्या पातळीवर ई-गव्हर्नन्स अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रशासन धोरणे आणि प्रश्न याचा अभ्यास आणि विश्लेषण करणारा पुण्यातील अभ्यासगट (Think Tank) 2021 पासून कार्यरत आहे.
Bhosari News : दुरुस्तीसाठी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल उद्यापासून बंद
या संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील महापालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा आढावा घेतला जातो. सदर ऑर्गनाइजेशनद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेद्वारे महाराष्ट्रातील 27 महापालिकेतील सेवा, पारदर्शकता , उपलब्धता , अधिकृत सरकारी वेबसाईट, मोबाईल app तसेच सोशल मिडिया handles इ. चा अभ्यास करुन विविध निर्देशांकाद्वारे प्रसिद्ध करणेत आलेल्या “ई-गव्हर्नन्स” निर्देशांक अहवालाद्वारे पिंपरी-चिंचवड 10 पैकी 6.23 गुण गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या निर्देशांकाद्वारे अंतर्गत सरकारी उपहारात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यापासून ते नागरिकांना सेवा आणि हक्कांचे वितरण करणे, वेगवेगळ्या सरकारी निर्णयाची माहिती (PCMC News) वेळेत उपलब्ध करून देणे, सरकारी व्यवहारात पारदर्शकता आणणे याचा समावेश करण्यात आला. हे सेवा निर्देशांक 80 निकषांवर आधारित असून हे 80 निकष चार प्रमुख पैलूंवर आधारित आहे.
तंत्रज्ञान, सामग्री तरतूद, सेवा तरतूद , सहभाग आणि प्रतिबद्धता या चार निकषांचा अभ्यास करुन संबंधित इंडेक्सची चौकट ठरवली जातो. या अहवालासाठी बायनरी मूल्यांकन पद्धत वापरली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ ई-गव्हर्नमेंट सर्व्हे आणि नॅशनल ई- गव्हर्नन्स सर्व्हिस डिलिव्हरी असेसमेंट (NeSDA) च्या अहवालातही याच मूल्यांकन पद्धतीचा वापर केला आहे. बायनरी मूल्यांकन पद्धतीमध्ये, निकषाच्या पूर्ततेसाठी 1 गुण आणि निकष पूर्ण न केल्याबद्दल 0 गुण दिले जातात.
महापालिकेचे वेबसाईट मोबाईल ॲप व सोशल मीडिया या तिन्ही आघाड्यांवरती स्वतंत्रपणे मूल्यमापन केले गेले, मनपाने या सर्व आघाड्यांवरती उत्तम गुण मिळविले व राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला , मुख्य निकषांपैकी उपलब्धता ,सेवा व पारदर्शकता यामध्ये वेबसाईट व मोबाईल ॲप यांची (PCMC News) उत्तम कामगिरी राहिली.गत वर्षी देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक मिळविला होता. चालू वर्षी या संस्थेने निकष देखील बदलले व विस्तृत मुल्याकंन केले.