PCMC : उद्यानातील झाडांच्या फांद्या छाटा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) उद्यानातील मोडकळीस आलेली झाडे, झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात. उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात यावी तसेच ओपन जिम मधील नादुरुस्त साहित्य दुरुस्त करण्यात यावे अशा विविध मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या.

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज (सोमवारी) पार पडलेल्या जनसंवाद सभेत 79 नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारवजा सूचना सादर केल्या.  यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 21, 11, 3, 3, 12, 7, 11 आणि 11 नागरिकांनी उपस्थित राहून जनसंवाद सभेत सहभाग घेतला. नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.

अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे  सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर,  आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी भूषवले.(PCMC) तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते.

Metro News : मेट्रोचा दुसऱ्या टप्प्यातील बारा किलोमीटरचा मार्ग होणार सुरू

आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता तसेच उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन  या विभागांचे अधिकारी  उपस्थित होते. जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. ड्रेनेज वाहिन्या दुरुस्त करण्यात याव्यात, रस्त्यांची दुरुस्ती करावी,  जुने झालेल्या सार्वजनिक शौचालयांचे नुतनीकरण करण्यात यावे, उद्यानातील मोडकळीस आलेली झाडे, झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात. उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात यावी तसेच ओपन जिम मधील नादुरुस्त साहित्य दुरुस्त करण्यात यावे, उघड्यावर कचरा टाकणार्‍या नागरिकांना दंड करावा, अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावी, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा. उद्यानात धुम्रपान तसेच  रस्त्यांवर किंवा इतरत्र अस्वच्छता  करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करावी.

रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पथारीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, खराब झालेल्या  ड्रेनेज लाईन दुरुस्त कराव्यात शहर परिसरात वेळोवेळी किटकनाशक फवारणी करण्यात यावी,(PCMC) अनधिकृत बांधकामांवर प्रतिबंध व निष्कासनाची कारवाई करावी अशा सूचनावजा तक्रारींचा समावेश आहे.

 

 

]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.