PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचे दोन दिवस असाधारण रजा म्हणून मान्य

एमपीसी न्यूज – जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध (PCMC)  मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 14 आणि 15 मार्च रोजी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. या दोन दिवसात सेवेतील खंड होऊ नये म्हणून दोन दिवस असाधारण रजा म्हणून सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढला आहे.

 

MPC News Podcast 31 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

राज्यभरातील सरकारीकारी कार्यालयासह पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 14 आणि 15 मार्च रोजी कामबंद आंदोलन केले.या दोन दिवसांचे कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल, की नाही, अशी चर्चा सुरू होती.

 

मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी संघाने संपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दोन दिवसांची हजेरीची अनुपस्थिती न टाकता असाधारण रजा टाकावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार असाधारण रजा टाकण्यास (PCMC) सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.