PCMC : विशाखा समिती अध्यक्षाविनाच…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत ( PCMC ) तब्बल 2 हजार 237 महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मध्यवर्ती विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून या समितीवर अध्यक्षच नसल्याचे समोर आले आहे.

महापालिकेमधील महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटावे. कार्यालयात कामकाज योग्य वातावरण असावे. त्यांना कोणी त्रास दिल्यास तक्रार करून न्याय मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या नियमानुसार विशाखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी सदस्या आहेत. तर, वर्ग एकच्या महिला अधिकारी समितीच्या अध्यक्षा असतात.

Aalandi : आळंदी शहराचा दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

या समितीवर सहआयुक्त आशादेवी दुरगुडे या अध्यक्षा होत्या. त्या 31 मार्चला निवृत्त झाल्या. तेव्हापासून समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रार कुठे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयुक्तांसमोर प्रस्ताव ठेवला आहे. सहआयुक्त आशादेवी दुरगुडे या सेवानिवृत्त झाल्याने या विशाखा समितीवर सध्या कोणी अध्यक्ष नाही.

याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले,  विशाखा समितीवर अध्यक्ष नेमण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. तो ( PCMC ) आयुक्तांसमोर ठेवला आहे. त्यांची स्वाक्षरी झाल्यास तात्काळ अध्यक्षांची नेमणूक करण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.