PCMC : …तर घरोघरचा कचरा एक एप्रिलपासून उचलणार नाही

एमपीसी न्यूज – महापालिकेकडून ओला व सुका कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी ओला व सुका कचरा यांचे विलगीकरण (PCMC) करून देणे गरजेचे आहे. येत्या एक एप्रिलपासून ज्या घरांतून कचरा विलगीकरण करून मिळणार नाही. त्यांचा कचरा उचलला जाणार नसल्याची भूमिका महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी आयोजित ‘संवाद आयुक्तांशी’ या ऑनलाइन कार्यक्रमात आयुक्त सिंह यांनी भूमिका मांडली. शहरातील शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांच्या स्तरावरच कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी.(PCMC)  खत निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवेत. ज्या सोसायट्यांकडे जागा उपलब्ध आहे, त्यांनी सोसायटीतच खतनिर्मिती प्रकल्प उभारावा. मात्र, ज्या सोसायट्यांकडे जागा नाही त्यांनी अन्य संस्थांकडून कचऱ्यावर प्रक्रिया करून घ्यावी. केंद्र सरकारच्या 2016 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या संस्थांनी त्यांच्या स्तरावरच प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. या सोसायट्यांना मालमत्ता करातील सामान्य करामध्ये पाच टक्के तर झिरो वेस्टसाठी आठ टक्के सवलत दिली जाणार आहे.

 

Pune News : समुद्रातील अनधिकृत मशीदचा विषय भोंग्यासारखा होऊ नये – आनंद दवे

सध्या 90 टक्के कच-याचे विलगीकरण होत आहे. (PCMC) मोशी कचरा डेपो येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प, हॉटेलमधील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस निर्मिती करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पांसाठी ओला व कचरा विलगीकरण गरजेचे आहे. नागरिकांनी ओला व सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र कचरापेटी वापरावी, असेही आयुक्त सिंह म्हणाले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.