PCMC : भाजप खासदारांच्या निकटवर्तीयांना प्राणी सुश्रुषा केंद्राचे काम थेटपद्धतीने?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राणी सुश्रुषा केंद्राचे(PCMC)कामकाज भाजपच्या उत्तरप्रदेशमधील प्राणी प्रेमी खासदारांच्या संस्थेला थेट पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप अॅड. प्रज्वल दुबे यांनी केला.
दुबे म्हणाले की, निर्बिजकरण करण्यासाठी खासदारांच्या (PCMC) ओळखीच्या दीपा बजाज यांना कामकाज दिले आहे. महापालिका हद्दीतील श्वानांचे निर्बीजीकरण होताच नाही. नेहरूनगर कोंडवाडा येथे कार्यरत संस्था बाहेरून श्वान आणून त्यांचे निर्बीजीकरण करत आहे. त्याची सीसीटीव्ही व्हिडिओ माझ्या कडे आहेत. तसेच बोगस डॉक्टर मार्फत भटक्या श्वानांचे उपचार करत असल्याचा देखील सीसीटीव्ही व्हिडीओ माझ्याकडे आहे.

HSC Exam : 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी 3 हजार 320 केंद्रांवर देणार बारावीची परीक्षा

पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले की,  दीपा बजाज या सीएसआरमधून काम करतात. महापालिका महिन्याला त्यांना 80 हजार रुपये देते. त्यांचे 8 कर्मचारी आहेत. श्वानांचा अपघात झाल्यास त्याला उचलून आणतात. आजारी श्वानांना रुग्णालयात दाखल करुन घेतले जाते. उपचार करुन बरे केले जाते. बरे करुन सोडून दिले जाते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.