PCMC Worker Retirement : सह शहर अभियंता सतिश इंगळे यांच्यासह 24 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC Worker Retirement) महापालिकेचे सह शहर अभियंता सतिश इंगळे यांच्यासह 24 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्य सांभाळून आनंदाने जगावे आणि आपली सेवानिवृत्ती ही नवीन चैतन्यमयी जीवनाची आवृत्ती ठरावी असे मार्गदर्शन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

महापालिकेच्या वतीने माहे सप्टेंबर 2022 अखेर सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला. या कार्यक्रमास माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, माजी नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे, सरचिटणीस अभिमान भोसले, कोषापाल नितीन समगीर, उपाध्यक्ष मनोज माछरे, चारुशीला जोशी, कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माजी नगरसदस्य भाऊसाहेब भोईर यांनी सेवानिवृत्त (PCMC Worker Retirement) कर्मचा-यांना आरोग्य जपून आपले संगीत, कला यासारखे आवडते छंद जोपासावे असे मार्गदर्शन केले.

माहे सप्टेंबर 2022 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये सह शहर अभियंता सतिश इंगळे, लेखाधिकारी पद्माकर कानिटकर, कार्यालय अधिक्षक नरेंद्र दुराफे, महाद्रग वाघेरे, उपलेखापाल राजेंद्र धाकड, सिस्टर इनचार्ज संगीता पाटील, वायरलेस ऑपरेटर राजश्री शेवाळे, उपशिक्षक रेहाना सय्यद, मंगला लोखंडे, अग्निशमन विमोचक जयराम कदम, सुरक्षा सुपरवायझर कालिदास वाल्हेकर, रखवालदार आनंदा जगताप, शिपाई प्रमोद पाटील, मजूर खलील शेख अब्दुलगणी, आनंदराव शिंदे, अरुण सोनवणे, सफाई कामगार लता कांबळे, सुमन नवले, संजीवनी भोसले, सफाई सेवक ओमबत्ती वाल्मिकी, आया सायरा पठाण यांचा समावेश आहे.

PCMC Tax : हस्तांतरित मूल्याच्या निर्णयाचा फेरविचार करा – राहुल कलाटे

तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये सफाई कामगार सुरेखा मिसाळ, सफाई सेवक शेरसिंग कागडा, सुर्यकांत शेंडगे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.