PCMC News : कर्मचा-यांचे शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान – उल्हास जगताप

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचा-यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान असून त्यांनी केलेल्या उत्तम कामामुळे (PCMC News) शहराचा नावलौकिक वाढला आहे.  या योगदानाबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माहे नोव्हेंबर 2022 अखेर सेवानिवृत्त होणा-या 22 कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे नंदकुमार इंदलकर, तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

PCMC News : खड्डे बुजविण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन; आयुक्तांची माहिती

माहे नोव्हेंबर 2022 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, मुख्याध्यापिका रजिया तांबोळी, (PCMC News) कार्यालय अधिक्षक राजेंद्र देशपांडे, प्रतिभा क्षीरसागर, उल्हास देवचक्के, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद, मुख्य लिपिक काळुराम भालेकर, अंजली टिंगरे, स्टाफ नर्स मनिषा जावळे, सहाय्यक शिक्षिका अंजली कदम, उपशिक्षिका वंदना पाटील, मुकादम राजेंद्र सुमंत, रखवालदार विद्याधर धिवार, सफाई कामगार विद्या कोतवाल, विद्याबाई रोकडे यांचा समावेश आहे.

तसेच नोव्हेंबर 2022 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये मुख्य लिपिक नाजीम आतार, सफाई कामगार नागनाथ वाघमारे, गोजाबाई गावडे, कल्पना आगळे, सफाई सेवक गीता उजिनवाल, कचराकुली राजू तुळवे, नरेश कदम यांचा समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.