Moshi News : राडारोडा कचरा व्यवस्थापनाबाबत बुधवारी कार्यशाळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उद्या (बुधवारी)  मोशी येथील सी अँड डी वेस्ट मॅनेजमेन्ट प्लांट येथे सकाळी 10 वाजता राडारोडा कचरा व्यवस्थापन (सी अँड डी वेस्ट मॅनेजमेन्ट)  आणि धूळ नियंत्रण मोजमापन (डस्ट कंट्रोल मेजर्स ) कार्यशाळेचे आयोजन केले आहे. (Moshi News) शहरातील ठेकेदार, ठेकेदारांचे प्रतिनिधी तसेच विकासक धारकांच्या प्रतिनिधींनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

Pimpri News : शहरात गोवरचे 5 रुग्ण, कुदळवाडीत गोवरचा उद्रेक

बांधकाम करत असताना राडारोड्याचे व्यवस्थापन कसे करावे, धूळ व्यवस्थापन, धूळ नियंत्रण पद्धती, धूळ कमी करण्यासाठी साईट आणि शहर स्तरावर सामग्री हाताळणीसाठी प्रक्रिया व्यवस्थापन आणि सुरक्षा उपाय यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.(Moshi News) महानगरपालिकेचे संबधित वरिष्ठ अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित राहणार असून शहरातील ठेकेदार, ठेकेदारांचे प्रतिनिधी तसेच विकसक धारकांच्या प्रतिनिधींनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.