Pimpri News : आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी  यशवंतराव चव्हाण यांनी केली – उल्हास जगताप

एमपीसी न्यूज : भारताचे माजी पंतप्रधान यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते होते. (Pimpri News)त्यांनी केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी अनेक पदे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पदही भूषवले.  आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी देखील त्यांनी केली, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी उपपंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित् मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस,वल्लभनगर तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

Bhosari News : महाविद्यालयातील नव मतदारांची वोटर हेल्पलाईनद्वारे नोंदणी

या कार्यक्रमास वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहायक आयुक्त वामन नेमाणे, ह क्षेत्रीय अधिकारी  विजयकुमार थोरात, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्वला इंदुरकर,वैद्यकीय उप अधिक्षक मनीषा सुर्यवंशी, डॉ. प्रविण सोनी, डॉ.अनिकेत लाठी, डॉ.दिनेश गाडेकर, (Pimpri News) जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे आदी  उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.