Pimpri: घरबसल्या वैद्यकीय सल्ला देणारी महापालिकेची ‘मेड ऑन गो’ प्रणाली नागरिकांसाठी उपयुक्त- अजित पवार

pcmc's med on go system useful for citizens says ajit pawar

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्मार्ट सारथी ऍपच्या वतीने नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सल्ला व उपचारांबाबत माहिती मिळवण्यासाठी विकसित केलेली ‘मेड ऑन गो’ ही प्रणाली अत्यंत उपयुक्त असून नागरिकांनी जास्तीत जास्त या प्रणालीचा लाभ घ्यावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोविड साथीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी ‘मेड ऑन गो’ या प्रणालीचे उपमुख्यमंत्री यांनी उदघाटन केले.

राज्यमंत्री विश्वजीत कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार अशोक पवार, संजय जगताप, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पिंपरी-चिंचवड पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आयटी सेल प्रमुख नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते.

महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या ऍपबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, कोविड साथीबाबत नागरिकांना घरबसल्या अचूक मार्गदर्शन मेड ऑन गो द्वारे मिळणार असून त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे नॉन कोविड रुग्णांची तपासणीसाठी कोविड सेंटरवर विनाकारण होणारी गर्दी यामुळे कमी होईल.

व्हिडिओ कन्सलटिंगची सुविधा या प्रणालीमध्ये आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सारथी ऍपद्वारे कंटेन्मेंट भागातील कोविड रुग्ण शोधता येतील. नागरिकांना ई पास, हेल्थ असेसमेंट सर्व्हे, सिटीझन व्हॉलेंटर, घरपोच किराणा, औषधे, फळभाज्या अशा सुविधा उपलब्ध असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.