Omicron Varient : ‘ओमायक्रॉन व्हेरिएंट’! मागील 15 दिवसांत परदेशातून शहरात आला असाल तर ‘या’ नंबरवर करा तात्काळ संपर्क

एमपीसी न्यूज – ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंघाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. मागील 15 दिवसांमध्ये परदेशातून शहरात आलेल्या नागरीकांनी 8888006666 या कोविड हेल्पालाईनवर माहिती कळवावी. त्यांची RT-PCR टेस्ट करण्यात येईल. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine ) कक्षात ठेवून वेळेत उपचार करण्यात येतील. जेणेकरुन विषाणूचा प्रसार टाळण्यास मदत होईल.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ या – कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना आणि त्यासंदर्भात आवश्यक व योग्य पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘ओमायक्रॉन’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका-यांची आज (मंगळवारी) बैठक झाली.

‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की मागील 15 दिवसांमध्ये परदेशातुन महापालिका कार्यक्षेत्रात आलेल्या नागरिकांची माहिती महापालिकेमार्फत कार्यान्वीत करण्यात आलेल्या कोविड हेल्पालाईन क्रमांक 8888006666 वर कळविण्यात यावी.

जेणेकरुन परदेशातून आलेल्या नागरीकांची RT-PCR टेस्ट करण्यात येईल. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर संस्थात्मक विलगीकरण (Institutional Quarantine ) कक्षात ठेवुन वेळेत उपचार करण्यात येतील व सानिध्यात आलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरण (Home Quarantine) कक्षात राहण्याच्या सूचना देण्यात येतील. जेणेकरुन विषाणूच्या प्रसार टाळण्यास मदत होईल, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले.

दरम्यान, महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, कोरोनाचा ‘ओमायक्रॉन व्हेरिएंट’ नवीन आहे. त्याचा संसर्ग कितीतरी अधिक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. या विषाणूची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये यासाठी शहरवासीयांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे. मागील 15 दिवसात परदेशातून शहरात आलेल्या प्रत्येक नागरिकाने आरटीपीसीआर चाचणी करावी, जेणेकरुन योग्यवेळी उपचार करता येतील. नवीन विषाणूचा प्रसार रोखता येईल. त्यामुळे परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी स्वत:हून चाचणी करावी. महापालिकेच्या कोविड हेल्पालाईन  8888006666 वर माहिती द्यावी”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.