PCNTDA: प्राधिकरणाच्या ‘सीईओ’पदी बन्सी गवळी; पदभार स्वीकारला

PCNTDA: Bansi Gawli as the Authority's 'CEO'; Charge Accepted प्राधिकरण माझ्यासाठी नवीन आहे. त्याची संपूर्ण माहिती घेणार आहे. त्यानुसार कामाचे धोरण ठरविणार असल्याचे गवळी यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना सांगितले.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) मुंबई शहराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज (बुधवारी) पदभार स्वीकारला आहे. प्राधिकरण माझ्यासाठी संपूर्णपणे नवीन आहे. माहिती घेऊन कामाचे धोरण ठरविणार असल्याचे गवळी यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

नियोजनबध्द व सर्वांगिण विकास करणे व विकसित झालेले जमिनीचे भूखंड गरजेनुसार निवासी, शैक्षणिक, औद्योगिक,वाणिज्य व सामाजिक कारणांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 14 मार्च 1972 मध्ये स्थापना झालेली आहे.

भाजप सत्ताकाळात 6 सप्टेंबर 2018 रोजी सदाशिव खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत राज्यात सत्ता परिवर्तन झाले. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकासआघाडी सरकार आले. महाविकास आघाडी सरकारने खाडे यांना पदमुक्त करत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडे ‘पीसीएनटीडीए’चा कारभार दिला होता.

त्यानंतर प्रमोद यादव यांची सीईओपदी वर्णी लागली होती. यादव 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांच्याकडे प्रभारी जबाबदारी दिली होती.

आता राज्य सरकारने मुंबई शहराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांची प्राधिकरणाच्या ‘सीईओपदी’ नियुक्ती केली आहे. त्यांनी आज पदभार देखील स्वीकारला आहे.

प्राधिकरण माझ्यासाठी नवीन आहे. त्याची संपूर्ण माहिती घेणार आहे. त्यानुसार कामाचे धोरण ठरविणार असल्याचे गवळी यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.