PCNTDA News : अजितदादा ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून शहर विकासाला गती देतील- विलास लांडे

शहरासह जिल्ह्यातील रखडलेले व नवीन प्रकल्प मार्गी लागतील

एमपीसी न्यूज – 49 वर्षांच्या कालखंडानंतर प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलीन होणार आहे. 842 गावांना विकासाची दिशा देणाऱ्या पीएमआरडीएकडे पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी आली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या दुरदृष्टीच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहराचा ज्या पटीने विकास झाला तेवढ्याच पटीने पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून या दोन शहरासह पुणे जिल्हाचा विकास झपाट्याने होणार आहे, असा विश्वास माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केला.

माजी आमदार लांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे आता पीएमआरडीएमध्ये विलीन होणार आहे. त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मौजे मोशी येथे सेक्टर नं 5 व 8 मधील सुमारे 98 हेक्टर जागेमध्ये ‘आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र’ स्वत: उभारणी करण्याचा निर्णय काही वर्षापुर्वी घेतला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात तसेच तळेगाव, चाकण, रांजणगाव या भागांमध्ये वाढते औद्योगिकरण यामुळे या ठिकाणी औद्योगिक प्रदर्शन केंद्राचा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. मोठी गंतवणूक शहरात येऊ शकते.

लोकनेते शरद पवार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प निर्माण होणार होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या आराखडयास मंजूरी दिली. त्यानुसार हे प्रकल्प होणे गरजेचे आहे. मात्र सत्ता बदल झाल्यानंतर तत्कालीन भाजप सरकार व महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी याला ‘खो’ घातला. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी मुळे प्राधिकरणाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचा विकास झाला. प्राधिकरण हे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये विलीनीकरण झाले असले तरी अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याचा विकास झपाट्याने होणार आहे.

ज्या प्रक्रारे अजित दादा नी पिंपरी चिंचवड शहरातले प्रलंबित विकास प्रकल्प मार्गी लावले, त्याच प्रकारे पुणे क्षेत्र विकास प्राधिकरण च्या माध्यमातून जिल्ह्यातील रखडलेले व नवीन प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वास लांडे यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.