Chinchwad : साडे बारा टक्के परतावा शेतकऱ्यांना लवकरच मिळणार — सदाशिव खाडे

एमपीसी न्यूज –   मागील  अनेक वर्षांपासून वाल्हेकरवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या प्राधिकरणाने आदिग्रहन केलेल्या जमिनीच्या बदल्यात परतावा म्हणून साडे बारा टक्के जमीन परत मिळावी अशी प्रलंबित असणारी मागणी लवकरच पूर्ण होणार असून नियमानुसार बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा मिळेल असे मत प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी वाल्हेकर वाडी येथे केले.

वाल्हेकरवाडी येथील लक्ष्मीनगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर,पुणे जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एकनाथराव टिळे,ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे,नगरसेविका संगीता भोंडवे,नगरसेवक नामदेव ढाके,सुरेश भोईर,दिलीप काटे ,सर्व संचालक आणि बहुसंख्येने सभासद  उपस्थित होते.खाडे पुढे म्हणाले की  आघाडी सरकारने जाणीवपूर्वक प्राधिकरणाला अध्यक्ष म्हणून कोणाची ही नेमणूक केली नसल्याने मागील 20 वर्षांपासून  हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे परंतु आता आमच्या सरकारने अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याने शहरातील प्राधिकरणाचे  प्रलंबित असणारे सर्व प्रश्न सुटणार आहेत.  शेतक-यांच्या हक्काचा परतवा त्यांना मिळावा या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून येत्या अधिवेशना नंतर लागलीच हा प्रश्न मार्गी लागेल.वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पुरस्कारथी- काशिनाथ भोंडवे,बाळासो हुलावळे (सहकार मित्र पुरस्कार),  सुरेखा पाटील,सविता अडसूळ (आदर्श माता), कल्याण खामकर,रोहिणी जोशी (आदर्श शिक्षक),सीताराम शिंदे(आदर्श सैनिक), अतुल क्षीरसागर (आदर्श पत्रकार ).
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर यांनी केले.सुत्रसंचलन सचिन वाल्हेकर यांनी केले तर आभार रवींद्र वाल्हेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.