रविवार, सप्टेंबर 25, 2022

PDCC Chairman: पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची वर्णी

 

एमपीसी न्यूज राष्ट्रवादीच्या प्रा. दिंगबर दुर्गाडे यांचे नाव निश्चित केले आहे. दिंगबर दुर्गाडे यांनी  यापूर्वी देखील जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भूषवले आहे. उपाध्यक्षपदासाठी सुनील चांदेरे  यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. अजित पवार सर्व निवडून आलेल्या संचालकांची बैठक घेत नाव निश्चित केले  आहे. जिल्हा बँकेवर 17 जागा जिंकत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. 

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील 3 ते 4 नावं चर्चेत होती. यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार , माजी आमदार रमेश थोरात ही नावं चर्चेत होती. . अजित पवार यांनी  सर्व निवडून आलेल्या संचालकांची बैठक घेत नाव निश्चित केले  आहे. जिल्हा बँकेवर 17 जागा जिंकत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले. दरम्यान  अजित पवार बँक संचालक यांच्यातील जिल्हा बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाबाबतची बैठक संपली आहे. जवळपास एक तास संचालकांशी अजित पवारांनी चर्चा केली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर सर्व संचालक निवडणुकीसाठी जिल्हा बँकेकडे रवाना झाले होते. एक तास चाललेल्या बैठकीत अजित पवार यांनी इच्छुकांची मते  जाणून घेतल्याची माहिती आहे.

 

spot_img
Latest news
Related news