PDFA Football League : निखिलच्या सुरेख प्रदर्शनाने जाएंटस ‘अ’ संघाचा विजय

एमपीसी न्यूज : जाएंटस ‘अ’ संघाने आज पीडीएफए फुटबॉल लीग (PDFA Football League) स्पर्धेत एनडीए युथ संघावर 9-1 असा दणदणीत विजय मिळविला. निखिल शेलारची हॅटट्रिक त्यांच्या विजयात महत्त्वाची ठरली. 
एसएसपीएमस मैदानावर आज झालेल्या द्वितीय श्रेणीतील बहुतेक सामन्यांचे निकाल एकतर्फी लागले. यात जाएंटसचा विजय सर्वात मोठा होता. नॅशनल युथ एफए आणि राहुल एफ ए या अन्य संघांनी एकतर्फी विजय नोंदविले.
‘ब’ गटातील सामनयात निखिलने पहिल्याच मिनिटाला संघाचे खाते उघडवले. त्यानंतर त्याने 11 आणि 29व्या मिनिटाला गोल केले. त्यांच्याकडून अन्य गोल जीवन नलगे (९वे मिनिट), आदेश सोनकांबफे (14, 58वे मिनिटे), कडू (15वे), अभिजित म्हसवडे (37 आणि 53नवे मिनिट) यांनी केले. एनडीएकडून एकमात्र गोल हरिकृष्णाने पेनल्टीवर केला.
याच गटातील अन्य सामन्यात नॅशनल युथ एफ ए (PDFA Football League) संघाने बोपोडी इलेव्हन संघाचा 4-1 असा पराभव केला. धनंजय लडकत याने 10व्या , तन्मय इंगळे याने 12व्या मिनिटाला गोल केले. त्यानंतर वैभवने 35 आणि 59व्या मिनिटाला दोन करून संघाची आघाडी वाढवली. स्टिफन काटे याने 22व्या मिनिटाला बोपोडीसाठी एक गोल केला.
राहुल एफए संघाने ग्रीन बॉक्स चेतक ब संघाचा 3-0 असा पराव केला. या शेंडेने 18व्या मिनिटाला गोल केल्यावर शशांत तिवापरीने 42 आणि 57व्या मिनिटाला दोन गोल केले.
सप महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या तृतिय श्रेणीच्या सामन्यात पुणेरी वॉरियर्सने आपले आगेकूच कायम राखताना कन्सीएंट एफए चा 7-0 असा धुव्वा उडवला. विवेक घेनांद याने तिसऱ्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर आदित्य नलानवडे याने 8, ओमकार रसाळने 12, संकेत डोंगरेने 27, प्रियेश पठाणे 40, महाराणा रानडे याने 51 आणि पियुष कुलकर्णी याने 61व्या मिनिटाला गोल केले.
ड गटातील सामन्यात अशोका इलेव्हन संघाला खडकी ब्ल्यूजने 1-1 असे बरोबरीत रोखले. अशोका संघाच्या श्रीकांत महाडिकने 15व्या मिनिटाला गोल केल्यावर शोएब सलमाणी याने 21व्या मिनिटाला गोल करून खडकीला बरोबरी साधून दिली.
निकाल –

सप महाविद्यालय – तृतिय श्रेणी

ई गट नॉईजी बॉईज 3 (आयुज कुटे 1ले, सागर पाटिल 23वे. दिनेश राठोड 37वे मिनिट) वि.वि. स्निग्मय एफसी 0

नाझ एफसी 0 बरोबरी वि. सासवड एफसी 0
एफ गट – परशुरामियन्स सी 2 (साहिल परदेशी 14वे, हर्षल कांगडे 58वे मिनि) बरोबरी वि. थंडर कॅटस ब 2 (अॅंडी 25वे-पेनल्टी, रामेश्वर पी 60+2वे मिनिट)
पुणेरी वॉरियर्स 7 (विवेक घेनांद 3रे, आदित्य नलावडे 8वे, ओमकार रसाळ 12वे, संकेत डोंगरे 27वे, प्रियेश पठाण 40वे, महाराणा रानडे 51वे, पियुष कुलकर्णी 60+1 वे मिनिट)  वि.वि. कन्सीएंट एफसी 0
ड गट – इन्फंटस एफसी 7 (सुस्नेश यादव 3रे, मेल्विन अॅन्थोनी 25, 35वे मिनिट, सचिन सल्याने 43वे, इलियाझ नायडू 33वे मिनिट, सॅम्युएल डॅनिएल 49वे, 53वे मिनिट) वि.वि. भोर एफसी 2 (अक्षय 18वे, स्वरुप 56वे मिनिट)

एसएसपीएमएमस मैदान – द्वितीय श्रेणी

ब गट – राहुल एफ ए 3 (आनंद शेंडे 18वे, शशांक तिवारी 42वे, 57वे मिनिट) वि.वि. ग्रीनबॉक्स चेतक ब 0
जाएंटस ए – 9 (निखिल शेलार 1ले,11वे, 29वे मिनिट, जीवन नलगे 9वे, आदेश सोनकांबळे 14, 58वे, अक्षय कडू 15वे, अभिजित म्हसवडे 37, 53वे मिनिट) वि.वि. एनडीए युथ स्पोर्टस क्लब 1 (हरिकृष्ण 48वे मिनिट -पेनल्टी)
नॅशनल युथ एफ ए 4 (धनंजय लड़कत 10वे, तन्मय इंगळे 12वे, वैभव जोशी 35, 59वे मिनिट) वि.वि. बोपोडी एफ ए1 (स्टिफन काटे 22वे मिनिट)
सी गट – उत्कर्ष क्रीडा मंच ब (पुढे चाल) वि. संगम यंग बॉईज
ड गट – अशोका इलेव्हन 1 (श्रीकांत महाडिक 15वे मिनिट) बरोबरी वि. खडकी ब्ल्यूज 1 (शोएब सलमानी 21वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.