Yerawada : मोटारसायकलच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – येरवडा येथे मोटारसायकलच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (28) साडेसातच्या सुमारास सादल बाबा चौकात घडली.

रमेश यादव (वय 60, रा. नाशिक), असे मयताचे नाव आहे.

रमेश हे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सादल बाबा चौकातून पायी जात होते. यावेळी एका अज्ञात मोटारसायकलने भरधाव येत त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मोटारसायकलस्वार हा अपघाताची माहिती न देता फरार झाला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तेजस भोसले यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.