सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Crime News : चाकण येथे टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

 एमपीसी न्यूज : चाकण येथे टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू मंगळवारी झाला आहे.

वॉचमन कल्याण हाके या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत त्याचे सहकारी राम गोरे, (वय 52) यांनी फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.

याप्रकरणी टेम्पो चालक दत्तात्रय सावंत, (वय 32 रा. चांडोली, ता. खेड, जि. पुणे) याला अटक कण्यात आले आहे. त्याच्या विरोधात मोटर व्हेईकल कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री 11.45 वा फिर्यादीचा सहकारी वॉचमन कल्याण हाके हे सेहगल शोरूमसमोर पुणे – नाशिक हायवे क्रॉस करीत असताना त्याला दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोची धडक बसली.टेम्पो चालक आरोपी दत्तात्रय सावंत याने त्याच्या ताब्यातील वाहन वेगात चालवून हाके यांना धडकून त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम केली व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.

spot_img
Latest news
Related news