Chikhali : पादचारी तरुणाचा चक्क हिसकावला मोबाईल

एमपीसी न्यूज – मोबाईलवर बोलणाऱ्या एका पादचारी तरुणाचा मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रकार संभाजीनगर चिंचवड येथे घडला. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी घडली.

ऋषीकेश राजेंद्र भिंगारदे (वय 23, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असून चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषीकेश 7 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास संभाजीनगर चिंचवड येथून रस्त्याने पायी चालत जात होते.  क्रीडा संकुलजवळ आल्यानंतर ते फोनवर बोलत असताना त्यांच्या मागून दोन दुचाकीवरून चारजण आले आणि दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने ऋषीकेश यांच्या हातातून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला.

दरम्यान, मोबाईल हिसकावणा-याने त्याच्या साथीदारांना ‘चला लवकर काम झाले’ असे म्हटले आणि सर्व चोरटे संभाजीनगरच्या दिशेने निघून गेले.या प्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.