Chakan Crime News : कार अपघातात गंभीर जखमी पादचाऱ्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू 

एमपीसी न्यूज – कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात कडाचीवाडी, खेड या ठिकाणी चाकण शिक्रापूर रोडवर गुरुवारी (दि.14) रात्री दहाच्या सुमारास घडला. 

संजीवकुमार रामदयाल कोरी (वय 26, रा. कडाचीवाडी, खेड) असे अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी जयंत नारायण कड (वय 43, रा. कडाचीवाडी, खेड) यांनी शुक्रवारी (दि.15) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संजीवकुमार कोरी चाकण शिक्रापूर रोडवरुन पायी चालत जात होते. या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. कार चालकांने याठिकाणाहून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या कोरी यांचा शुक्रवारी (दि.15) पहाटे तीनच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.