Pimpri : पादचारी तरुणाला दोन टवाळखोरांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – आपल्या लहान मुलीसोबत जात असलेल्या तरुणाला धक्काबुक्की करून मारहाण केली. दोघांनी तरुणाच्या डोक्यात दगडी गट्टू मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 25) रात्री सातच्या सुमारास रमाबाईनगर येथे घडली.

कल्याण सूर्यकांत काकनाटे (वय 30, रा. रमाबाईनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजय सावंत (वय 23, रा. रमाबाईनगर, पिंपरी) आणि अनिकेत मोरे (वय 22) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण त्यांच्या लहान मुलीला घेऊन रस्त्याने पायी जात होते. रमाबाईनगरमधील साबळे किराणा दुकानासमोर आले असता आरोपींनी रस्त्याने जात असलेल्या एक इसमाला हाताने मारून कल्याण यांच्या अंगावर ढकलले. यामध्ये कल्याण आणि त्यांची मुलगी खाली पडले. याबाबत कल्याण यांनी आरोपींना जाब विचारला असता दोघांनी मिळून कल्याण यांना हाताने मारहाण केली. तसेच दगडी गट्टू डोक्यात मारला. यामध्ये कल्याण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.