Pune : विकास आराखड्यात पादचाऱ्यांचा विचार नाही – महेश झगडे

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्यांचे नियोजन करताना पादचाऱ्यांचा कुठेही विचार केला गेला नाही, असे माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी सांगितले.

परिसर संस्थेतर्फे ‘राईट टू वॉक’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी परिसर संस्थेचे प्रमुख सुजित पटर्वधन, अवनिश अखोरी, सूरज जयपूरकर उपस्थित होते़. पादचारी आणि त्यांच्या हक्काविषयी कोणीही आग्रही नाहीत. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, महापालिका कायदा तथा मोटार वाहन कायद्यातही कुठल्याही तरतूदीचा उल्लेख आजपर्यंत केला गेला नाही, असेही झगडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.