PCMC News: नाल्यात उतरून सफाई करणा-या कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – कोणताही आदेश नसताना नाल्यात उतरून साफसफाई करणा-या कर्मचाऱ्यावर 500 रूपयांच्या दंडात्मक शास्तीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिला आहे.

सदर व्यक्ती महापालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. 5 मार्च रोजी पालिकेने नाशिक फाटा ते लांडेवारी रोड या परिसरात प्लॅगेथॉनचे आयोजन केले होते. तसेच प्लॅगेथॉनमध्ये नालेसफाईचा कोणताही आदेश यांना दिला नव्हता. मात्र, त्यानंतरही सफाई कर्मचाऱ्याने दिलेले कामकाज सोडून सुरक्षा साधनांचा वापर न करता नालेसफाई केली.

Pune News: उदयनराजे हतबल होऊच शकत नाहीत, त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोचल्या – देवेंद्र फडणवीस

नालेसफाई करताना सदर कर्मचाऱ्याचा फोटो पाठवून शहरातील नागरिकांनी तक्रार केली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने सफाई कर्मचाऱ्याला खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्या कर्मचाऱ्याने आपली चूक मान्य केली आहे. तर, त्यांची पालिकेत 23 वर्षांची सेवा झाली आहे. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची विभागीय चौकशी रद्द करण्यात आली आहे. तसेच 500 रूपयांच्या दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात सदर कर्मचाऱ्याने गैरवर्तन अथवा कर्तव्यामध्ये कसूर केल्याचे निदर्शनात आल्यास यापेक्षा कडक कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.