Pimpri : कंपोस्टींग खत प्रकल्प कार्यान्वित नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई

 'आय लॅण्ड सोसायटी'कडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील दररोज 100 किलोग्रॅमपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी कंपोस्टींग खत प्रकल्प निर्माण केले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने अशा गृहनिर्माण सोसायट्यांवर कारवाईस सुरुवात केली आहे. आज (सोमवारी) ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या ‘आय लॅण्ड सोसायटी’कडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार शहरातील मोठ्या प्रमाणावर कचरा उत्पन्न करणा-या आस्थापनांनी ओल्या कच-याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. आस्थापनेच्या परिसरामध्ये कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजाविल्या होत्या. परंतु, अनेक सोसायट्यांनी कंपोस्टींग खत प्रकल्प सुरु केले नाहीत. त्यामुळे कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, आस्थापनांविरोधात 1 डिसेंबर 2019 पासून आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.

कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या ‘आय लॅण्ड सोसायटी’ या गृहनिर्माणकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे. ज्या खासगी आस्थापनांमार्फत दररोज 100 किलो ग्रॅमपेक्षा जास्त कचरा उत्पन्न  होतो. अशा मोठ्या प्रमाणावर कचरा उत्पन्न करणा-यांनी इमारतीमध्ये तातडीने कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like