Pimpri News : वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत असून त्यामुळे अपघाताच्या (Pimpri News) संख्येतही मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. याची दखल घेत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.त्याअनुशंगाने राॅंग साईड, नो इंट्री तसेच बीआरटीच्या मार्गीकेने जात असलेल्या वाहनांविरूध्द कारवाई करण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव हि औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे आहेत. या ठिकाणी नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर केला जात आहे. येथील नागरिकांकडून वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन होत असून दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणातही वाढ होत आहे.

Ganesh Bhegade : निमित्त वाढदिवसाचे अन् लक्ष्य विधानसभेचे!

याची दखल घेत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने पोलिस आयुक्त विनयकुमार चाैबे यांच्या आदेशानुसार विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुशंगाने राॅंग साईड, नो इंट्री तसेच बीआरटीच्या मार्गीकेने जात असलेल्या वाहनांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत राॅंग साईडने जाणार्या एकूण 1092 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून नो इंट्रीच्या एकूण 3138 घटना दाखल करण्यात आल्या आहेत. (Pimpri News) या कारवाईतून 22,55,250 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर बीआरटीच्या मार्गीकेतून जाणार्या 2450 जणांवर कारवाई करत 14,06,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही मोहिम सुरू राहणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.