Pimpri : स्वच्छतागृह अस्वच्छ; ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

मुकादमाचा एक दिवसाचा पगार कापला, प्रभाग अधिका-यांना सक्त ताकीद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ प्रभाग क्षेत्रातील स्वच्छतेची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.22) अचानक पाहणी केली. स्वच्छातागृह अस्वच्छ होते. तसेच राडारोडा पसरलेला होता. अस्वच्छतेला कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई, मुकादमाचा एक दिवसाचा पगार कापण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच प्रभाग अधिका-यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. 

शहरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज कचरा उचलला जात नाही. सार्वजनिक स्वच्छातागृहांची साफसफाई केली जात नाही. त्यावरुन महापौर राहुल जाधव यांनी आरोग्य अधिकारी आणि प्रभाग अधिका-यांची बैठक घेऊन अधिका-यांना फैलावर घेतले. तसेच गुरुवारपर्यंत शहर चकाचक करण्याची ‘डेडलाईन’ दिली होती. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारपासून पाहणी दौरा सुरु केला आहे. आयुक्त सरप्राईज व्हिजीट देऊन स्वच्छतेची पाहणी करत आहेत.

भोसरी कार्यक्षेत्रातील ‘इ’ प्रभागाची आयुक्त हर्डीकर यांनी सोमवारी अचानक पाहणी केली. प्रभाग कार्यालयातील स्वच्छतागृह अस्वच्छ आढळून आले. साफसफाई केली नव्हती. त्यामुळे ठेकेदारावर दंडात्मक कारवाई, मुकादमाचा एक दिवसाचा पगार कापण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच प्रभाग अधिका-यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. आपण दररोज दुपारी बारानंतर शहरातील स्वच्छतेची पाहणी करणार आहे. दुपारी बारापर्यंत सर्व स्वच्छता झाली पाहिजे. अस्वच्छता आढळल्यास प्रभाग अधिकारी, ठेकेदार, मुकादम यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.