BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सार्वजनिक ठिकाणी जाहिरातीचे पॅम्प्लेट लावणा-या व्यावसायिकांकडून 10 हजारांचा दंड वसूल

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाची दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारती, पीएमपीएमएल बस स्थानक, शौचालय, भुयारी मार्गाच्या भिंती, उड्डाणपुलाच्या भिंती, महावितरणचे लाल रंगाचे फिडर, बीएसएनएलचे फिडर, विजेचे खांब, रस्त्याच्या कडेला व डिवायडरच्या कठड्यावर, सोसायटीच्या सिमाभिंती अशा सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक जाहिरातीचे भिंतीपत्रक(पॅम्प्लेट) लावून शहर विद्रूप करणाऱ्या १७ व्यवसायिकांवर कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने दंडात्मक कारवाई केली आहे. 

शहर परिसरात जागेचे खरेदी विक्री करणारे, खाजगी शिकवणी वर्ग चालवणारे, स्पर्धा परीक्षांचे वर्ग व अभ्यासिका घेणारे, खोल्या, बंगले व फ्लॅटचे  भाड्याने व खरेदी विक्री करणारे इस्टेट एजंट, खाजगी खानावळीचे डब्बे, दवाखान्याच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे कागद व पोस्टर डिंकाने व खळीने चिकटवले जातात. अशा प्रकारच्या जाहिरातीचे कागद व पोस्टर्समुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छता होते. त्यामुळे कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन अंतर्गत डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण, मयूर काॅलनी हजेरी कोठी या ठिकाणी या व्यावसायिकांवर करवाई कारणात अली आहे. जाहिराती लावणाऱ्या मालकांना फोनवर संपर्क साधून त्याठिकाणी जाऊन त्यांना योग्य ती समज देऊन १७ व्यावसायिकांना दंडात्मक कारवाई करून १० हजार ७०० रूपये दंड वसूल करण्यात आले आहे.

शहरात बेकायदेशीर जाहिराती लावून सुंदर शहराला विद्रूप करणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांनी सांगितले आहे. ही कारवाई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त शिशीर बहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली व आरोग्य निरिक्षक शिवाजी गायकवाड, सचिन लोहकरे, प्रमोद चव्हाण, महेश लकारे यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड आण्णा ढावरे, संजय कांबळे, लक्ष्मण सोनवणे यांनी केली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3