BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शहरवासियांनी अनुभवला यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

पुण्याचा पारा 41.1 अंशावर; लोहगावचे तापमान 41.5 अंश

Pune : यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान आज नोंदवले गेले. आजचे कमाल तापमान 41.1 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. तर लोहगावचे तापमान 41.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून पारा सतत वाढत आहे. त्यामुळे उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहे.  दुपारच्या वेळेस संकोट, स्कार्फ,  छत्री यांच्याशिवाय घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे.  तसेच दुपारच्या कडक उन्हामुळे नागरिकांनी झाडांच्या सावलीत आश्रय घेतला. जणू काही सूर्य आग ओकत आहे, असे वाटत होते.  शहरवासियांनी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस आज अनुभवला.

.