Pimpri: ‘संचारबंदीत’ही नागरिकांचा मुक्त ‘संचार’, नागरिकांनो जीवावर उदार होऊ नका!

एमपीसी न्यूज – कोरोना विषानूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकाराने कडक पाऊले उचलली आहेत. संचारबंदी, जमावबंदी लागू केली असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचा ‘संचारबंदीत’ही मुक्त ‘संचार’ दिसून येत आहे. ‘काहीही’ कारणे सांगून नागरिक घराबाहेर पडत आहेत. यातून नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. खरंच ‘अत्यावश्यक’ कारण असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे; मात्र नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पोलिसांची संख्याही कमी दिसून येत आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहराच्या अनेक भागात लोक गर्दी करताना दिसत आहेत. कोरोनाचा आजार टाळण्यासाठी पाळाव्या लागणाऱ्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. काहीही कारणे सांगून नागरिक घराबाहेर पडत आहेत. वयोवृद्ध नागरिक, प्रतिकार शक्ती कमी असलेले नागरिक, लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची जास्त लक्षणे आहेत. त्या नागरिकांनी अतिशय काळजी घेणे आवश्यक असताना देखील नागरिक बाहेर पडताना दिसून येत आहेत. दरम्यान, नागरिकांनी घराजवळील दुकान, भाजी मंडईतून भाजी खरेदी करावी. अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन ‘एमपीसी न्यूज’च्या वतीने शहरवासीयांना करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील परिस्थिती!
#रात्री जेवल्यानंतर नागरिक शतपावलीसाठी बाहेर फिरतात

#सकाळी मॉर्निंग वॉकला, देवदर्शनाला नागरिक घराबाहेर पडतात

# घराबाहेर पडणा-यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक

#खरेदीसाठी भाजी मंडई, दुकानांमध्ये गर्दी

# पोलिसांनी काहीही कारणे सांगून नागरिक बाहेर पडतात

#आकुर्डीत पोलिसांकडून बॅरिकेट्स, रस्त्यावर येणा-या नागरिकांना जाब विचारतात

#मॉलमध्ये एकावेळी केवळ पाच लोकांनाच आतमध्ये प्रवेश

#आतमध्ये जाताना सॅनिटायझर दिले जाते

#डी-मार्टमध्ये कुपन देऊनच नागरिकांना प्रवेश

#कुपन घेतल्यानंतर चार ते पाच तासाने नंबर येतो

#मोरवाडी चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

#चारही बाजुने बॅरिकेट्स लावले

#पिंपरी, निगडी चौकात रिक्षा वाल्यांची संख्या अधिक

#निगडीच्या पीएमपीएमएल डेपोतून सकाळी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी दहा बस सोडल्या

#रस्त्यावर पोलिसांची संख्या कमी

#पोलिसांकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी नाही

#शहराच्या अंतर्गत भागात गस्त नाही

#जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची ये-जा सुरुच

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.