Moshi News: कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी सामाजिक भान ठेऊन वागावे : महेश लांडगे  

एमपीसी न्यूज – कोरोना परिस्थिती गंभीर होत असून सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी सामाजिक भान ठेऊन वागावे, असे भाजप शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

महिला बचत गटांच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.   सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाल्या,  प्रत्येक स्त्री मध्ये उद्योग व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या आपले घर व कुटुंब घडवण्याची धमक असते. त्यासाठी कोणावर अवलंबून न राहाता व कुणाशीही तुलाना न करता आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला हवं.

महिलांना घरची लक्ष्मी असे म्हटले जाते. वडिलांच्या निधनानंतर घरातील 3 महिलांनी कशाप्रकारे न खचता संघर्ष केला ” याचा अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.