Pune : गरवारे बालभवनचा करार 30 वर्षांसाठी नुतनीकरण करण्यास स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज – सारसबागेसमोर असलेल्या “गरवारे बालभवन’चा करार 30 वर्षांसाठी नुतनीकरण करण्याला महापालिकेच्या स्थायी समितीने  मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी ही माहिती दिली. 

गरवारे बालभवनचा उपक्रम “ओम चॅरिटी ट्रस्ट’ या संस्थेमार्फत चालवला जातो. 15 ऑगस्ट 1988 पासून येथे हा उपक्रम सुरू आहे. वेळोवेळी या संस्थेला मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्याने संयुक्त प्रकल्पाद्वारे 30 वर्षे कालावधीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 73 लाख 51 हजार 225 रुपयांचा प्रिमियम दोन टप्प्यात भरून घेऊन दरवर्षी नाममात्र भाडे आकारून ही जागा ट्रस्टला वापरण्याला मंजुरी दिल्याचे, कांबळे यांनी सांगितले.

संस्थेशी झालेला करार 31 ऑक्‍टोबर 2018 रोजी संपुष्टात आला आहे. त्यानंतर 11 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत 30 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.