PMPML News : पूर्व PCMT च्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पूर्व PCMT च्या 117 कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत सामावून घ्यावे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ त्यांना देण्याच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की,  पूर्व PCMT चे एकूण 235 कर्मचारी सन 1999 मध्ये तात्पुरत्या स्वरुपात  पिंपरी-चिंचवड  महानगरपालिकेकडे तत्कालीन आयुक्तांचे मान्यतेने वर्ग करण्यात आले होते. PMPML मधील एकूण 235 कर्मचाऱ्यांपैकी 118 कर्मचारी सेवानिवृत्त तसेच स्वेच्छानिवृत्त झाले आहेत.

उर्वरित  एकूण 117 कर्मचारी सद्यस्थितीत महापालिकेच्या सेवेत कामकाज करीत आहेत. या सर्व कर्मचारी यांची महापालिकेकडे जवळपास 20 वर्षे सेवा झालेली आहे.  त्यासर्व कर्मचाऱ्यांना  महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, तसेच इतर कर्मचाच्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ देणेबाबतचा आदेश राज्यशासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी- छापवाले यांनी  मार्चमध्ये आपणास दिलेले आहेत.

PMPML मधील 117 कर्मचारी अद्यापही महापालिकेच्या सेवेत आहेत. त्यामध्ये चतुर्थ श्रेणीमधील शिपाई, हेल्पर, क्लिनर, वाहनचालक, लेबर इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य शासनच्या नगर विकास विभागाने PMPML च्या 117 कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सर्व लाभ देण्याचे आदेश उपसचिवांनी दिलेले आहेत. परंतु, त्यातील 7 कर्मचारी 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.