Pune News : नाटक, तमाशा, लावणीसह सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी

एमपीसी न्यूज – सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कार्यचालन कार्यपध्दतीचा अवलंब करुन नाटक, लोककला अंतर्गत तमाशा लावणी व इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा 13 मार्च 2020 पासून केला. त्यानंतर संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. नाटक, लोककला, तमाशा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उदर निर्वाह चालवणाऱ्यांच्या जगण्याची भ्रांत झाली.

मात्र कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर अनलॉकडाऊन करत टप्प्याटप्प्याने जनजीवन पुरणा सुरळीत करण्यात आले. दरम्यान नाटक सुरू करण्यासही शासनाने परवानगी दिली. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमधून सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, लोककला अंतर्गत तमाशा, लावणी इत्यादी कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आल्या बाबतच्या तक्रारी लोकप्रतिनिधी मार्फत सांस्कृतिक कार्य विभागाकडे गेल्या.

त्यावरून शासनाने 5 नोव्हेंबर 2020 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यात करावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.