Pune News : ३० जानेवारीला एल्गार परिषदेच्या आयोजनास अखेर परवानगी

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांकडून अखेर एल्गार परिषदेला परवानगी देण्यात आली आहे. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी पुणे पोलिसांकडे ही परवानगी मिळण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, ही परवानगी मिळाली असून ३० जानेवारीला म्हणजे शनिवारी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद होणार आहे.

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून एल्गार परिषदेला परवानगी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील होते. राज्य सरकारने सभागृहासाठी परवानगी दिली नाही तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ. मात्र, कोणत्याही परिस्थितीत एल्गार परिषद होणारच, असा इशाराच कोळसे पाटील यांनी दिला होता मात्र, आता अखेर ही परवानगी मिळाली आहे.

पुणे पोलिसांकडून यापूर्वी ३१ डिसेंबरच्या एल्गार परिषदेसाठी परवानगी नाकारण्यात आली होती. त्याचप्रमाणे, दुसरीकडे भाजपसह उजव्या विचारसरणीच्या पक्ष आणि संस्थांचाकडून एल्गार परिषदेला नेहमीच तीव्र विरोध असतो. मात्र, आता अखेर पुणे पोलिसांकडून परवानगी मिळाल्याने भाजपच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.