International News : घातक F-15EX फायटर भारताला विकण्याची परवानगी

एमपीसी न्यूज : भारताच्या हवाई दलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. कारण अमेरिकने बोईंग कंपनीला भारताला घातक F-15EX फायटर विमान विकण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकन सरकराने आम्हाला घातक F-15EX फायटर विमान इंडियन एअर फोर्सला विकण्याची परवानगी दिली आहे. अशी माहिती बोईंगमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

भारतीय वायुसेना जुन्या फायटर विमान्यांच्या जागी ११४ बहुउद्देशीय घातक फायटर विमान खरेदी करण्याची योजना आखत आहे. सध्या भारतीय वायुसेनेकडे स्वीडनचे ग्रिपेन आणि फ्रान्सची राफेल ही फायटर विमाने आहेत. याबरोबरचं आता अमेरिकन बोईंग विमानेही भारतीय वायुसेनेची ताकद वाढवणार आहेत.

बोईंग ही अमेरिकेतील आघाडीची विमान उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने तयार केलेली काही विमानांचा भारतीय सैन्य दलामध्ये याआधीही वापरण्यात आली आहेत. बोईंग डिफेन्स,स्पेस अँड सिक्युरिटीमध्ये इंडिया फायटर्स सेल्सचे प्रमुख अंकुर कांगलेकर यांनी या विमानीची खास वैशिष्ट्ये सांगितले आहेत. ते म्हणाले “F-15EX च्या रुपाने IAF ला सुसज्ज आणि बहुउद्देशीय फायटर विमान मिळेल.

शस्त्रास्त्र वाहून नेणं आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हे विमान अद्वितीय आहे. F-15EX विमानांसाठी बोईंगला अमेरिकन सरकारकडून मार्केटिंगचा परवाना मिळाला आहे. भारताला विमानांचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झालाय. F-15EX हे नवीन बदल असलेले अत्याधुनिक फायटर विमान आहे. हे बहुउद्देशीय फायटर विमान सर्व प्रकारच्या वातावरणात तसेच दिवसा-रात्री मोहिमा पार पाडण्यासाठी सक्षम आहे” असेही ते म्हणाले.

मल्टीरोलर असणारे हे फायटर विमान F-15E ही F-15 विमानाची पुढची आवृत्ती आहे. अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांच्या हवाई ताफ्यात F-15E व F-15 ही विमाने आजही आहेत. तर सौदी अरेबिया आणि कतार या आखातीमधील दोन देशांकडे F-15EX ही विमाने आहेत. या वर्गातील कुठल्याही फायटर विमानांपेक्षा F-15EX विमानांचा पल्ला आणि जास्त पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे” असे बोईंगकडून सांगण्यात आले.

F-15EX मध्ये ३६ टनापर्यंत वजन उचलून उड्डाण करण्याची क्षमता आहे. बोईंगच्या कंपनीच्या सांगण्यानुसार, F-15EX १३ टनापर्यंत शस्त्रास्त्र वाहून नेऊ शकते. या विमानातील अत्याधुनिक दिशादर्शक प्रणालीमुळ जमिनीवरील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार करता येऊ शकतो. F-15EX मध्ये हवेतून हवेत हल्ला करणारी २२ मिसाइल्स डागण्याची क्षमता आहे. F-15EX मध्ये F-35 या स्टेल्थ फायटर जेटपेक्षाही जास्त मिसाइल्स वाहून नेण्याची ची क्षमता आहे.

भारत आणि अमेरिकेमध्ये गेल्या १५ वर्षापासून २० शस्त्र खरेदी करण्यासाठी २० कोटींचा करार झाला आहे. त्यामुळे बोईंगप्रमाणेच अमेरिकन लॉकहीड मार्टिन कंपनीलाही भारतीय वायुसेनाला F-21 विमान विकण्याची परवानगी मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.