Pimpri News : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ

माहेरहून पाच लाख, पाच तोळे दागिने आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. तसेच माहेरहून पाच लाख रुपये आणि पाच तोळे दागिने आणण्याची मागणी केली. याबाबत सासरच्या तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप कांतीलाल शेडगे, वंदना कांतीलाल शेडगे (दोघे रा. माताळवाडी फाटा, भूगाव), स्वाती सचिन सुतार (रा. सुतारवाडी, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 13 ऑगस्ट 2020 ते 27 मार्च 2021 या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला किरकोळ कारणावरून मारहाण करून घालूनपाडून  अपमानास्पद वागणूक दिली. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला.

माहेरहून पाच तोळे दागिने आणि गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण केली नसल्याने आरोपींनी विवाहितेला घराबाहेर काढले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.