Chinchwad : कोरोना हॉटस्पॉट आनंद नगर झोपडपट्टीत मास्क न लावणाऱ्याला मारहाण

Person beaten for not wearing mask in Corona HotSpot Anandnagar slum area.

एमपीसी न्यूज- कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या चिंचवड आनंद नगर झोपडपट्टीत तोंडाला मास्क का लावला नाही म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी एकाला मारहाण करण्यात आली तसेच तुला पाहून घेतो अशी धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला.

याप्रकरणी भास्कर गायकवाड, अतिश जगताप, प्रेम जगताप (सर्व राहणार आनंद नगर) यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अजय बाळू पाळके  (वय, 26, रा. आनंद नगर, चिंचवड) यांनी या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय यांच्या भावाने तोंडाला मास्क लावला नव्हता. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीच्या भावाला मास्क का लावला नाही असा जाब विचारला. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तुला पाहून घेतो अशी धमकी दिली.

याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.