Pune : जीवे मारण्याची धमकी देत इसमाला पाच लाखांना लुटले

सेव्हन लव्हज चौकाजवळील घटना

एमपीसी न्यूज – व्यवसायातील जमा झालेली रकम गाडीच्या डिक्कीत ठेवून घरी जात असताना इसमाला अडवणूक करून जीवे मारण्याची धमकी देत पाच लाख रुपयांनी लुटले. ही घटना मंगळवारी (दि.18) सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान सेव्हन लव्हज चौकाजवळ शंकरशेठ रोडवर घडली.

याप्रकरणी परेशकुमार कडीया (वय, 35 शुक्रवार पेठ, पुणे), यांनी फिर्याद दिली.

फिर्यादी कडीया हे मंगळवारी सायंकाळी त्यांच्या व्यवसायातील जमा झालेली रकम त्यांच्या शुक्रवार पेठ येथील राहत्या घरी गाडीच्या डिक्कीत ठेवून घेऊन जात होते. यावेळी सेव्हन लव्हज चौकाजवळून जात असताना तीन अनोळखी इसमांनी कारमधून येऊन त्यांच्या दुचाकीला गाडी आडवी लावली. कडीया यांना गाडीवरून उतरवून त्यांना खाली ढकलून दिले. तसेच आवाज केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तर अन्य एका इसमाने त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ठेवलेली निळ्या रंगाच्या पिशवीतील 5 लाख रुपये रोख रकमेसह जबरदस्तीने काढून घेऊन फरार झाले.

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडक पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.