Pune News : पुण्यातील आप्पा बळवंत चौकात एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या चौकात (Pune News) किरकोळ कारणावरून मुलांमध्ये वाद झाले ज्यामध्ये दोघांनी एकावर कोयत्याने वार केले,ही घटना आज (दि.31) दुपारी बाजीराव रस्त्यावरील नूमवी शाळेसमोर घडली. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून बाजीराव रस्त्यावर महाविद्यालयीन युवकाच्या दोन गटात झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली. यात महाविद्यालयीन युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकात कोयते उगारल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते.
Pune Crime : महिलांचे मंगळसुत्र हिसकावणारी टोळी जेरबंद, दहा गुन्ह्यांची उकल
त्यानंतर कोयते उगारून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. कोयते उगारून अप्पा बळवंत चौकातून दोघे जण पळाले. ज्या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले त्याने त्यांचा (Pune News) पाठलाग सुरू केला. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले.